खालापूर । खालापूर बुधवारी सकाळीच मोठ्या भयानक घटनेने हादरले, पाण्यात बुडून एकाच कुटूंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 3 लहान मुले असून 2 महिलांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण तालुका शोक सागरात बुडाला आहे. बुधवारी सकाळी 9च्या सुमारास खालापुरातील शिरवली गावातील लोहार काम करणारे मधुकर सदाशिव आरते. तांबट 70 यांची सून व भाचे सून नेहमी प्रमाणे धुणे धुण्यासाठी गावाच्या शेजारीच असणार्या बाळगंगा नदीच्या पात्रात गेले होते. या नदीला स्थानिक आंबा ओहळा असेही म्हणतात. आपल्या 3 मुलांसह त्या महिला तेथे गेल्या होत्या.
पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू
डोणवत धरणाचे पाणी शेतीसाठी सोडल्याने या स्थानिक नदीला सध्या पाणी आहे. तर गावकर्यांनी गुरांना, व वापरण्यासाठी पाणी मिळावे यासाठी या नदीच्या पात्राला बांध टाकून पाणी अडवले आहे. या ठिकाणी 10 ते 12 फुट खोल पाणी साठले असते. या ठिकाणी गौरी गणेश आरते 33 व मीनाक्षी दिलीप वाकनीस 31 या कपडे धुवत होत्या. तेजस्विनी गणेश आरते वय 10 ही त्यांना मदत करत होती. कपडे धुण्यात दंग असताना मीनाक्षीचा मुलगा शुभम 7 व गौरीचा मुलगा तुषार 7 नेहमी प्रमाणे डुबकी मारण्यासाठी पाण्यात गेले. त्यामध्ये या ठिकाणी कातळावर चिकट निसरटा झाल्याने हि दोनही मुले घसरून पाण्यात जात बुडू लागली. त्यांना बाहेर काढण्यासाठी तेजस्विनी व गौरी गेल्या असता या दोन बुडणार्या मुलांनी दोघींना घट्ट मिठी मारली. त्यामध्ये त्या बुडू लागल्या. त्या बुडत आहेत असे दिसताच आई व काकीला कपडे धुण्यासाठी मदत करणारी तेजस्विनी हि त्यांना वाचविण्यासाठी गेली. तिचा हि त्यामध्ये बुडून मृत्यू झाला. या सर्वांनाच पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच शिरवली गावातील ग्रामस्थ घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले. परंतु या 5 जणांना वाचवण्या अगोदरच बुडून मृत्यू झाला होता. स्थानिकांनी खालापूर पोलिसांना खबर देत 5 जणांचे शव खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदना साठी आणले. शवविच्छेदना 5 जनाचे शव नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
9 महिन्याच्या मुलीचा टाहो
मिलिंद वाकनीस यांना 2 मुले असून 9 महिन्याची मुलगी आहे. तर या घटनेत त्यांची पत्नी मीनाक्षी व मुलगा शुभम यांचा मृत्यू झाला असून 9 महिन्याची लहान मुलगी वाचली आहे. आई दुध पाजण्यासाठी येईल या आशेने 9 महिन्याची लहान मुलगी भुकेसाठी टाहो फोडत आहे.
खालापुरातील बुडण्याच्या घटना
19 जून 2003 मध्ये खोपोलीच्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात ढग फुटू होवून 7 जन वाहून जात ठार झाले होते. तर 10 जणांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले होते. सन 2007 मध्ये मोरबे धरणात लाकडी तराफा लावून धरणातून ये, जा करीत असता हळदी समारंभासाठी जाणार्या पिरकट आदिवासी वाडीतील 4 जणांचा मोरबे धरणात बुडून मृत्यू झाला होता. याच ठिकाणी व आसपास च्या बाजूला 6 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. पाताळगंगा नदीच्या पात्रात म्हशी धुण्यासाठी गेलेल्या वाशिवली गावातील 2 शाळकरी सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला होता. तर डोणवत धरण व आसपासच्या परिसरात मागील 5 वर्षात 4 जन बुडाले होते. त्या घटने नंतरखालापुरातील हि सर्वात मोठी बुडून मरणाची दुर्घटना आहे.