जळगाव । महापौर निवडीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यानुसार 29 ऑगस्ट पासून अर्ज मिळणार होते. परंतु, काल एकही अर्ज पक्षांकडून नेण्यात आला नव्हता. तर आज दुसर्या दिवशी बुधवार 30 ऑगस्ट रोजी खान्देश विकास आघाडीचे माजी उपमहापौर तथा नरगसेवक सुनील महाजन यांनी चार अर्ज नेले आहेत. तर भाजपा सहयोग अपक्ष नवनाथ दारकुंडे यांनी एक अर्ज नेला आहे. खान्देश विकास आघाडीने पक्षाच्या नगरसेवकांसाठी व्हीप जारी केला आहे. तर मनसे, शिवसेना व जनक्रांतीच्यावतीने देखील व्हीप जारी करण्यात आला आहे. महापौरांची निवडणूक 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज नगरसचिव कार्यालत मिळणार आहेत.