खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

0

मुंबई – खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करु नये, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा विचार सरकार करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजेश टोपे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांचे रुग्ण डॉक्टरांकडे उपचारासाठी येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होऊ नये. त्यामुळे त्यांनी अशा परिस्थितीत असंवेदनशीलता न दाखवता दवाखाने सुरु ठेवावेत.