धुळे । खासगी संवर्गात नोंदणी झालेली वाहने भाडेतत्वावर वापरू नयेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी कळविले आहे. खासगी संवर्गात नोंदणी झालेली वाहने सरकारी/निमसरकारी कार्यालयात भाड्याने अथवा मोबदला घेवून वापरण्यात आल्यास वाहन चालक व मालकाविरुध्द मोटारवाहन कायदा 1988 च्या कलम 192 अ नुसार दंडात्मक कारवाईस पात्र ठरतात.
तसेच कलम 53 (1)(ब) अन्वये या वाहनाची नोंदणी चार महिन्यांपर्यंत निलंबित करता येते. परिवहन संवर्गात उदा. टुरिस्ट टॅक्सी, लक्झरी टॅक्सीमध्ये वाहन मालकाने रुपांतरीत केले, तर ही वाहने शासकीय, निमशासकीय कार्यालयात भाडेतत्वावर वापरता येतील, असे रुपांतरण मोटार वाहन कायदा तरतुदीप्रमाणे असल्याची खात्री करुनच परवानगी मिळेल.