खासगी बस चालकांकडूनही पंचवीस टक्के वाढ

0

पुणे : दिवाळीच्या सुट्यांमध्ये एसटी महामंडळाने 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासगी बस चालकांनीही त्यांच्या भाडे दरात तब्बल वीस ते पंचवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरात वेळप्रसंगी आणखीही वाढ होऊ शकते, असे संकेतही या बसचालकांनी दिले आहेत. येत्या 1 नोव्हेंबरपासून ही भाडेवाढ लागू केली जाणार आहे.

स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, संगमवाडी आणि अन्य स्थानकांवरून खासगी बसेस सोडण्यात येतात. या खासगी वाहतूकदारांच्या माध्यमातून नागपूर, जालना, अमरावती, धुळे, अंमळनेर, वर्धा, बीड, नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणचा सर्व भाग, मुंबई, गोवा या ठिकाणी सेवा दिली जाते. या बसेससाठी खासगी बसचालकांच्या माध्यमातून मनमानी पध्दतीने भाडे आकारण्यात येते. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. हे वास्तव असतानाच दिवाळीच्या सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेऊन या बसचालकांनी पुन्हा भाडेवाढीसाठी डोके वर काढले आहे.