खासगी बस चालक-मालक जाणार संपावर

0

मुंबई । मुंबईत पिक अवरमध्ये अवजड वाहनांना बंदी घालण्याच्या पोलिसांच्या निर्णयाला मुंबई बस मालक संघटनेने विरोध दर्शवला आहे. मुंबई शहरात खासगी बससेवा पुरवणार्‍या बस चालक-मालकांनी 19 आणि 20 तारखेला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. अवजड वाहनांवरील बंदीबाबत चर्चा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आज पोलिस आयुक्त पडसलगीकरांची भेट घेतली. अवजड वाहनाबाबत मी फक्त सूचना केल्या होत्या, मात्र त्याच्या बंदीच्या अंमलबजावणीबाबत मला नाहीत नाही, असे भेटी दरम्यान पोलीस आयुक्तांनी मुंबई बस मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सांगितले. दरम्यान आम्ही ही बंदी लवकरात लवकर मागे घेऊ, असे आश्वासन पोलीस आयुक्त आणि वाहतूक विभागाचे सह आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितल्याच बस मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

अवजड वाहनांवरील बंदी प्रायोगिक तत्वावर
मुंबईत अवजड वाहनांवरील बंदी मागे घेण्यासंबंधी जोवर आश्‍वासन पूर्ण केले जात नाही, तोत, तोपर्यंत आम्ही 19 आणि 20 सप्टेंबर या दोन दिवसांच्या संपावर ठाम आहोत, असेही खासगी बस संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले आहे. मुंबईत मेट्रोच्या सुरु असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईच्या वाहतूक शाखेकडून अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. अवजड वाहनांची गर्दी आणि वाहनांमुळे होणारा ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणूनच सध्या दक्षिण मुंबईत प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

विशिष्ट वेळेपुरती असणार बंदी
अवजड वाहनांवरील बंदीसाठी एक विशिष्ट वेळ ठेवण्यात आली आहे. सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत दक्षिण मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश नसेल. एसटी, बेस्ट बस, स्कूल बस, प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचार्‍यांच्या बस, पाणी-दूध-भाज्यांसारख्या अत्यावश्यक सेवा किंवा पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणारी वाहने, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेडच्या गाड्यांना यातून सूट देण्यात आली आहे.