खासगी रुग्णालयात 300 रुग्ण

0
पिंपरी:पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे ‘स्वाईन फ्लू’चा प्रार्दुभाव वाढत आहे. गेल्या नऊ महिन्यात 20 जणांचा बळी गेला आहे.  गेल्या चार दिवसात तब्बल सहा जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर, शहरातील विविध खासगी रुग्णालयात सुमारे 200 ते 300 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. स्वाईन फ्ल्यूचा प्रार्दुभाव वाढत असून तो रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना स्थायी समितीच्या सदस्यांनी केल्या आहेत.
रुग्ण जगला पाहिजे
विलास मडिगेरी म्हणाले, ‘स्वाईन फ्लू’चा प्रार्दुभाव वाढत आहे. हा आजार संसर्गजन्य असून त्याच्यावरील उपचार  खर्चिक आहेत. रुग्ण जगला पाहिजे यासाठी पालिकेने प्रयत्न करावे. त्यासाठी महापालिकेच्या वायसीएमएच् रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात यावा’, अशा सूचना दिल्या आहेत.
महापालिकेच्या वायसीएमएच् रुग्णालयात आलेल्या स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांना तातडीने दाखल करुन घेण्यात येत असून त्यांना प्राधान्य दिले जात आहे. स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात पाच बेड राखीव ठेवले आहेत. तसेच जनरल वार्डात देखील बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूची लस आणि गोळ्या उपलब्ध आहेत.
– डॉ. के. अनिल रॉय, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी