खासगी संस्था पालिकेच्या ‘डाटा’चा गैरवापराची भिती

0

पिंपरी : महापालिकेच्या योजनांच्या फुकटच्या प्रसिद्धीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करत महापालिकेचा जनसंपर्क विभाग खाजगी संस्थेच्या ताब्यात देण्यास शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटर, एसएमएस सारखे स्वस्तातले पर्याय असताना पालिकेला मात्र खासगी संस्थेचा सोस पडला आहे. भाजपने करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरु केली आहे. भाजपच्या प्रचारासाठी सोशलमिडियाला काम देण्याचा घाट सत्ताधा-यांनी घातल्या असल्याचा आरोप करत शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी सोशल मिडीयावरील उधळपट्टी थांबवावी आणि महापालिकेचा जनसंपर्क विभाग खासगी संस्थेला देवू नये, अशी मागणी केली आहे. तसेच खासगी संस्था पालिकेच्या ’डाटा’चा गैरवापर करण्याची भिती व्यक्त करत हा विषय मंजूर केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.