खासदारद्वयींच्या पाठपुराव्याने कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीला गती मिळणार

0

ठाणे : कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीच्या प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. या जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल पुढील आठवड्यात ठाणे महापालिकेकडून केंद्रीय वाहतूक मंत्रालयाला सादर करण्यात केला जाणार आहे. त्यानंतर बंदरे आणि भूपृष्ठ वाहतूक केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी बैठक होणार आहे.

कल्याण-ठाणे-मुंबई या जलमार्गाचे काम मार्गी लागल्यास रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर पडणारा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होणार आहे. जवळपास ४ लाख प्रवासी दररोज कल्याण ते मुंबई असा प्रवास करतात. नियोजित जलमार्गामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन प्रवाशांना या जलमार्गामुळे दिलासा मिळेल आणि वाहतूक वेगवान आणि किफायतशीर होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल ठाणे महापालिका केंद्रीय वाहतूक मंत्रालयाला पुढील आठवड्यात सादर करणार आहे. लवकरच या जलमार्गाबाबत बंदरे आणि भूपृष्ठ वाहतूक केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पुढील निर्णय घेण्यासाठी बैठक होणार आहे.

सदर जलमार्गाचे काम गतीने पुढे सरकावे यासाठी ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे या खासदारद्वयींनी शासकीय आणि प्रशासकीय स्तरावर जलमार्गाच्या कामाचा पाठपुरावा सुरु ठेवला आहे. या जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्रीय वाहतूक मंत्रालयाला सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यासाठी बंदरे आणि भूपृष्ठ वाहतूक केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
चौकट
रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर पडणाऱ्या ताण कमी करण्याला सक्षम पर्याय म्हणून कल्याण-ठाणे-मुंबई या जलवाहतुकीकडे पहिले जात आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण-ठाणे-मुंबई या जलवाहतुक मार्गाचा समावेश केंद्र सरकारच्या महत्वाच्या १०१ जलमार्गांमध्ये करण्यात आला आहे.

सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत रेल्वे वाहतूकीवर प्रचंड ताण पडत असून या वेळांमध्ये रेल्वेतून पडून मृत्युमुखी-जायबंदी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. कल्याण, बदलापूर दिशेकडून तुफान भरून येणाऱ्या लोकलमध्ये चढायला न मिळाल्यामुळे दिवा, टिटवाळा आदी स्थानकांवर प्रवाशांनी आंदोलने देखील केली आहेत. दुसरीकडे रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे, प्रदूषण वाढत आहे. या सर्वावर प्रभावी उपाय म्हणून कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीचा विचार पुढे आला आहे.