खासदारांनी साधला शेतकर्‍यांशी संवाद

0

भुसावळ। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दीनिमित्त तळवेल येथे शिवार संवाद सभेत खासदार रक्षा खडसे, आमदार संजयसावकारे यांनी शेतकर्‍यांसोबत संवाद साधला. यात खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी केंद्र सरकारच्या तीन व राज्य सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात शासनाने घेतलेले निर्णय व योजना यांची माहिती संवादातून शेतकर्‍यांना दिली व त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या व संबधित सांगून सोडविल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा संघटक सुनिल नेवे, सभापती सुनिल महाजन, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी, प्रशांत पाटील, किरण चोपडे, सरपंच ज्ञानदेव झोपे, उपसरपंच यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.