खासदार आढळराव पाटील यांची औद्योगिक परिसरात बैठक संपन्न

0

पिंपरी-चिंचवड : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अभय सोपानराव भोर यांच्या कंपनीत खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला विविध भागातील उद्योजक व्यापारी कामगार व झोपडपट्टी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महानगरपालिकेकडे एमआयडीसी परिसरातील महिलांसाठी टॉयलेटची मागणी गेले चार महिन्यापासून फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अभय भोर हे सातत्याने करत असून त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. परिसरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत एकही महिलांसाठी टॉयलेट आत्तापर्यंत उभारलेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर महिलांसाठी शौचालय उभारण्यासाठी मदत करावी. शहरातील बहुतांश तरुण हे बेरोजगार आहेत, उच्चशिक्षित आहेत. परंतु एमआयडीसी भागात त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध नाही. नगरपालिकेने जो लघुउद्योजकांचा प्रकल्प हाती घेतलेला आहे,त्याला चालना द्यावी. नवीन महिलांसाठी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स तसेच तरुण गटांना इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून तरुणांना रोजगार सुरू करता येईल असे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले. बालाजीनगर परिसरातून नेहरूनगर भागात असंख्य विद्यार्थी पायी वाटचाल करताना त्यांना रस्ता क्रॉस करता येत नाही. त्यासाठी त्या भागांमध्ये भुयारी मार्ग किंवा पादचारी पूल उभारावा जेणेकरून अपघाताचा धोका होणार नाही. एमआयडीसी परिसरातील पर्यावरण उद्यानांमध्ये सुधारणा करून उद्योजकांसाठी जॉगिंग पार्क, आरोग्य शिबिरे व सहली आयोजित करण्यासाठी उद्योगांना मूलभूत सुविधा करून द्याव्यात अशी मागणी केली.

यावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पूर्ण माहिती घेवून म्हणाले की, लवकरच महानगरपालिका व एमआयडीसी अधिकारी यांची बैठक लावून सविस्तर मागण्या पूर्ण करण्यात येतील. नाशिक फाटा ते खेड प्रस्तावित सहापदरी मार्गाला लवकरच मान्यता मिळेल. नाशिक फाटा ते राजगुरुनगर हायवेच्या मध्ये मेट्रोचा विषय आल्यामुळे कामे होण्यास विलंब लागला. नाही तर बोराडेवाडी मोशी लवकरच झाला असता. पाटील पुढे म्हणाले की, आता प्लॅनिंग असे आहे की, नाशिक फाटा ते खेड 2013 पासून सुरुवात झाली आहे, ती आता पूर्णत्वास येत आहे. परंतु भूसंपादनात उशीर होत असल्याने विलंब होत आहे. त्यासाठी फायनान्सची मंजुरी मिळाली आहे, परंतु जागा मिळत नसल्यामुळे विलंब होत आहे.

या प्रसंगी फोरमचे अध्यक्ष अभय भोर, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, उद्योजक फोरमचे उपाध्यक्ष कार्तिक गोवर्धन, बालाजीनगरचे कार्यकर्ते इस्माईल नदाफ, करण शिंदे, संतोष गायकवाड, फोरम इव्हेंट ग्रुपचे मुजफ्फर इनामदार, चेतन साबळे, रमेश बटवाल, कृष्णा वाघमारे, विक्रमजीत दत्ता, भाऊसाहेब आडगळे, ए बी शेख, ऋषिकेश तावरे, श्रीकृष्ण नरहरी, लातूर भागाचे केतन बटवाल, पोपटराव लोखंडे पाटील व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड विकास आघाडीचे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे कार्यकर्ते उद्योजक उपस्थित होते.