जळगाव : भाजपचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांचे ट्विट अकाउंट हॅक झाले असून या प्रकरणी जळगाव सायबर सेल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सायबर पोलिसात तक्रार
खासदार उन्मेश पाटील यांचे सन 2014 पासून ट्विटवरर अधिकृत खाते असून शुक्रवार, 22 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता अज्ञातांनी हे खाते हॅक केले आहे. जळगाव सायबर क्राईम पोलिसांकडे या संदर्भात स्वतः खासदारांनी 23 रोजी लेखी तक्रार नोंदवत याबाबत तपास करण्याची मागणी केली आहे.