महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त सोहळ्याचे आयोजन
पिंपरी पिंपरी :-चिंचवड शहर हे कामगार नगरी म्हणून ओळखले जाते. 1 मे हा कामगार दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवशी असंख्य श्रमशक्तींना गौरविण्यात येते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील श्रमशक्तींना खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनद्वारे गौरविण्यात येणार आहे. ‘श्रमशक्ती पुरस्कार 2018’ हा पुरस्कार सोहळा चिंचवड मधील ऑटो क्लस्टर येथे पार पडणार आहे.
खासदार श्रीरंग बारणे आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेवक नारायण बहिरवडे, माजी शिक्षण समिती सदस्य गजानन चिंचवडे, नगरसेवक निलेश बारणे, अॅड. सचिन भोसले, कामगार नेते जयसिंग पोवार, मधुकर भोंडवे आणि नामदेव शेलार उपस्थित राहणार आहेत.
शहरामध्ये अनेक खाजगी व व्यावसायिक कंपन्या आहेत. यामध्ये काम करणार्या कामगार व अनेक श्रमिक संघटनांचे प्रमुख यांचा सन्मान कामगार दिनानिमित्त करण्यात येणार आहे. त्यामध्ये समीर धुमाळ, यशवंत भोसले, आशिष शिंदे, काशिनाथ नखाते, अशोक सातकर, निलेश काळोखे, दिलीप पवार, अनिल कवठेकर, संतोष कनसे, केशव घोळवे, सुनील लांडगे, गजेंद्र निंबाळकर, डॉ. वसंत भांदुर्गे, मनोजकुमार अनेकर, कैलास माळी, राकेश देशमुख, बाजीराव सातपुते आदींचा समावेश आहे. शहरातील सर्व कामगारांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.