कोथळीतील अनेक कार्यकर्त्यांची ‘घरवापसी’
मुक्ताईनगर- रावेर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तर यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरीदेखील लावली. कोथळी येथे 31 किलोचा केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी शिवसेनेत गेलेल्या कोथळीतील अनेक राजकीय पदाधिकार्यांनी रक्षाताईंसह माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात घरवापसी केली.
हे पदाधिकारी परतले स्वगृही
माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उमेश राणे, महेश पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी शिवसेनेतून एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला. खासदार खडसे यांनी भाजपाचा रुमाल टाकून त्यांचे स्वागत केले. संजय कोळी, विनोद पाटील, प्रमोद पाटील, उमेश कोळी, सोमनाथ मिस्तरी, निलेश कोळी, दिलीप लोहार, शंकर पाटील यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला. यामुळे कोथळीत सेनेला मोठे खिंडार पडले आहे.
यांची होती उपस्थिती
भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाने, उपसभापती प्रल्हाद जंगले, माजी सरपंच नारायण चौधरी, उपसरपंच संजय चौधरी, ग्रामपंचायत सदस्य पंकज चौधरी, नितीन चौधरी, बापू चौधरी, अनंता राणे, राजू पाटील, सुहास राणे, दामू राणे, राहुल राणे, अमित चौधरी आदींसह नागरीक उपस्थित होते.