खासदार रक्षा खडसेंची करण्यात आली वही तुला

0

मुक्ताईनगर। खासदार रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कार्यालयात सत्काराचा कार्यक्रम आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सर्वप्रथम जुने मुक्ताई मंदिरात आदिशक्ती मुक्ताई व तुळजा भवानीचे दर्शन घेवून आशिर्वाद घेतला. सतीश चौधरी यांच्यातर्फे खासदार खडसेंची वह्या तुला करुन त्या वह्या गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या.

उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप
येथील विनोद सोनवणे यांच्याकडुन लाडू तुला करण्यात आली. उज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. हरताळा फाट्यावरील हनुमान मंदिरात महाआरती झाली. याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे, रमेश ढोले, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदु महाजन, योगेश कोलते, अशोक कांडेलकर, राजू माळी, विलास धायडे, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, उपसभापती प्रल्हाद जंगले, जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे, निलेश पाटील, वैशाली तायडे, विकास पाटील, राजेंद्र सावळे, सुवर्णा साळुंखे उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी सरपंच ललित महाजन, सरचिटणीस सतीश चौधरी, संदीप देशमुख, डॉ. बी.सी. महाजन, पुरनाड सरपंच मनिषा देशमुख, विनोद सोनवणे, आसिफ बागवान,दीपक साळुंखे, दिलिप कदम, श्रीकांत पाटील, गणेश कोळी, दत्ता जोगी, बबलू कोळी, ग्रा पं सदस्य संजय कोळी, संजीव माळी, कैलास वंजारी, अजय जैन, पवन खुरपडे, रहस्य महाजन, सुनिल काटे, नारायण चौधरी, पुरुषोत्तम महाजन यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.