रावेरसह फैजपूर व सावद्यात फटाक्यांची आतषबाजी ; खासदारांच्या विजयाच्या घोषणा
भुसावळ- रावेर लोकसभा मतदारसंघात सलग दुसर्यांदा खासदार रक्षा खडसे या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर भुसावळ विभागातील रावेरसह फैजपूर, सावदा, मुक्ताईनगर येथे भाजपा-पदाधिकार्यांनी ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. देशभरात आलेल्या मोदी लाटेनंतर लाडूंसह पेढे भरवून आनंदोत्सवही साजरा करण्यात आला.
फैजपूरतही भाजपा कार्यकर्त्यांचा विजयोत्सव
फैजपूर- खासदार रक्षा खडसे विजयी झाल्यानंतर सुभाष चौकामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाचा गजर करत, फटाक्यांची आतषबाजी केली व त्यानंतर मिठाई वाटून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, जिल्हा दूध संघाचे संचालक तथा नगरसेवक हेमराज चौधरी, भाजपा शहराध्यक्ष संजय रल, माजी नगराध्यक्ष बि के चौधरी, रवींद्र होले, जितेंद्र भारंबे, निलेश पाटील, अनंत नेहेते ,रवींद्र सरोदे, पप्पू चौधरी, बाळू मेढे, माजी नगरसेवक अप्पा चौधरी, राजू काठोके, युवा मोर्चाचे भूषण चौधरी यांच्यासह असंख्य भाजपा तथा शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
रावेर तालुक्यात गुलालाची उधळण
रावेर- खासदार खडसेंच्या विजयानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आमदार जावळे यांनी देखील रावेरात वाद्याच्या तालावर ठेका धरला. कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. अंबिका व्यायाम शाळेजवळ कार्यकर्त्यांनी फटाके फोडले तसेच लाडूंचे वाटप करण्यात आले. अॅड.सुरज चौधरी, विवरा येथे मानस कुलकर्णीच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. भाजप तालुका सरचिटणीस वासुदेव नरवाडे, मानस कुलकर्णी, पंचायत समिती सदस्या योगीता वानखेडे, विकास देशमुख, सुभाष पाटील, टिकाराम जुनघरे, रामदास वानखेडे, ललित बोरोले, टिकाराम जुनघरे, भागवत महाजन, रवींद्र वासनकर उपस्थित होते.
सावद्यात फटाक्यांची आतषबाजी
सावदा- दुर्गामाता चौकात सायंकाळी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. नगराध्यक्षा अनिता येवले, भाजपचे आजी-माजी नगरसेवक, शिवसेनेचे मिलिंद पाटील, धनंजय चौधरी, भरत नेहते, शरद भारंबे, सुनील पाटील आदी उपस्थित होते. दुपारी बसस्थानक चौकात नगरसेवक राजेंद्र चौधरी, सचिन बर्हाटे, रीतेश पाटील, गजू ठोसरे, सूरज परदेशी, अतुल चौधरी, सागर चौधरी, शुभम सरोदे, सागर पाटील आदींनी देशात भाजपला मिळालेल्या विजयाचा जल्लोष केला.
वरणगावात विजयाचा आनंदोत्सव
वरणगाव- खासदार रक्षा खडसे यांच्या विजयाचा वरणगाव शहरात आनंदोत्सवत साजरा करण्यात आला. माजी मंत्री एकनाथ खडसे व खासदार खडसे यांचे वरणगावात आगमन होताच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली तसेच ढोलताशांच्या गजरात विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, नगरसेविका रोहिणी जावळे, जागृती बढे, नगरसेवक बबलू माळी, गणेश धनगर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, प्रदीप भोळे, शे.सईद, महेश सोनवणे, इफ्तेखार मिर्जा, गुड्डू बढे आदी उपस्थित होते.