भुसावळ– संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचे कामकाज केवळ 43 तास तर राज्यसभेचे कामकाज 45 तास चालू शकले तसेच दोन्ही सभागृहाचे कामकाजाचे तब्बल 248 तास वाया गेले. विरोधी पक्षांच्या आडमुठे धोरण वापरत गोंधळ घालून वेळ वाया घालवल्याने नैतीक पाप विरोधी पक्षांच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी लाक्षणिक एक दिवसाचे निषेध उपोषण केले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रात उपोषण केले. रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासह आमदार चैनसुख संचेती, तालुकाध्यक्ष शैलेश मिरगे व पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी नांदुरा येथे उपोषण केले. काँग्रेसच्या लोकशाही विरोधी भूमिकेला विरोध करण्यासाठी या उपोषणाला नांदुरावासीयांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला.