एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निधीत केले वर्ग
मुक्ताईनगर : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनाकरीता त्यांच्या खासदार निधीतून एक कोटी रुपये व एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निधीत वर्ग केले आहे.
घरातच थांबण्याचे केले आहे.
खासदार रक्षा खडसे यांनी लॉक डाउनच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना शासन आदेशाचे पालन करण्याचे तसेच विनाकारण बाहेर न निघता घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, भारत सरकारद्वारे पीएम केअर फंडाचे आयोजन केले आहे. सर्वांनी आपापल्या परीने शक्य असेल तेवढी म्हणजे 100, 200 रुपये आर्थिक मदत करून देशाच्या हिताला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.