रावेर : रुग्णांवर तातडीने उपचार होवून ते बरे व्हावेत तसेच भविष्यात येणार्या कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या सतर्कतेसाठी रावेर ग्रामीण रुग्णालयाला खासदार रक्षा खडसे यांनी स्वखर्चातून गोळ्या-औषध, सलाईन, सॅनिटायझरसह सुमारे 15 प्रकारचे वेगवेगळी औषधे देण्यात आली. खासदार रक्षा खडसे या रावेरला आल्या असता त्यांच्या उपस्थितीत ही औषधे ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील, पंचायत समिती सभापती कविता कोळी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाज, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, डॉ.एन.डी.महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सदस्य जितु पाटील, योगीता वानखेडे, माधुरी नेमाडे, बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे, बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, संदीप सावळे, हरलाल कोळी, प्रल्हाद पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.
लवकरच 40 बेडचा ऑक्सिजन प्लांट
खासदार खडसे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, रावेर ग्रामीण रुग्णालयात सुमारे 40 बेडच्या सुसज्ज ऑक्सिजन प्लांटला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मंजुरी दिली असून लवकरच रावेर ग्रामीण रुग्णालयात कामाल सुरूवात होईल, असे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना खासदार म्हणाल्या.