खासदार रवींद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरून ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

0

उस्मानाबाद: शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात उमरगा पोलीस स्टेशनमध्ये अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या तक्रारीवरुन पोलिसांनी ओमराजेंविरोधात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी एक व्हिडीओ क्लिप काढून ती व्हाट्स अॅपवर व्हायरल केल्याचा आरोप रवींद्र गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. यामुळे आपली बदनामी झाली असून राजकीय प्रतिमाही मलीन झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. खासदार रवींद्र गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन दिले असून ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणीही केली आहे.