खासदार राजू शेट्टी यांचा पोलीस मित्र संघटनेच्यावतीने गौरव

0

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्यावतीने अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, उद्योजक जीवन कळमकर, बाप्पू कारंडे, दत्तात्रय सायकर, महादेव गोरखे, अनिल चांदेरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र कपोते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक पोलीस बांधव हे शेतकरी कुटुंबातील आहेत. आपले शेती, घरदार, म्हातारे आई – वडील, भाऊ, बहिण यांना सोडून ते पोलीस खात्यात सेवा करतात. वारंवार दुष्काळ, शेतकऱ्यांच्या अडचणी यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाची शेतीची काळजी लागलेली असते. राजू शेट्टींमुळे आपल्या कुटुंबाची काळजी घेणारे कोणी आहे यामुळे त्यांना आधार वाटतो.

राजू शेट्टी म्हणाले की, गौरव माझा नसून अनेक हालअपेष्टा भोगून तग धरलेल्या माझ्या शेतकरी बांधवांचा गौरव आहे. माझ्या जीवात जीव असे पर्यंत मी शेतकऱ्यांचा लढा चालूच ठेवणार आहे.