कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांना तातडीनं कर्जपूरवठा देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
जळगाव : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जळगांव जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाला धारेवर धरलं.कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पन्नास टक्केचं कर्जपूरवठा करणार असल्याचं परिपत्रक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं काढलंय. शेतकरी सन्मान्न अभियान यात्रेवेळी असंख्य शेतकऱ्यांनी पतपूरवठ्यासंदर्भातल्या तक्रारी केल्या होत्या.त्याचा निपटारा करण्यासाठी खासदार राजू शेट्टी स्वत: जिल्हा बँकेत तातडीनं गेले होते.
बँकेची थकबाकी सुतगिरणी, सहकारी साखर कारखाने आणि मोठ्या थकबाकीदारांकडे थकीत असल्यानं कर्जपूरवठा करण्यासाठी बँकेकडे पैसेचं नसल्यानं कर्जपूरवठा होत नाही कर्जमाफीच्या रुपाने सरकारकडून बँकेला मिळालेले ६०० कोटी रुपये टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांना देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.राज्य सहकारी बँक म्हणजे जिल्हा बँकेची कसाई असल्याचं यावेळी समोर आल्याचं खासदार राजू शेट्टी म्हणाले.जिल्हा बँकेला राज्य सहकारी बँकेकडून कर्ज पाहिजे असल्यासं जेवढी कर्ज रक्कम पाहिजे असेल तेवढीचं ठेव राज्य सहकारी बँकेकडं ठेवण्याची सक्ती आहे. हे कर्ज जिल्हा बँकेला साडेनऊ टक्के दरानं घ्यावं लागतंय. मात्र त्यांच्या ठेवीला साडेसहा टक्के व्याजदर मिळतोय. याबाबत नाबार्ड आणि राज्य सहकारी बँक व्यवस्थापनाशी चर्चा करणार असल्याचं खासदार राजू शेट्टी म्हणाले. संपुर्ण कर्जपुरवठा केला तरचं एक लाख सभासद शेतकऱ्यांना कर्ज मिळेलं, असं विश्वासही शेट्टी यांनी व्यक्त केला.