खासदार श्रीकांत शिंदे यांचे दिघावासीयांसाठी गणपतीला साकडे

0

ऐरोली । कल्याण डोंबिवली मतदार संघाचे शिवसेना पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबई ऐरोली विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव मंडळांना धावती भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे मनपाचे माजी नगरसेवक अक्षय ठाकूर यांच्या राहत्या घरी जाऊन दर्शन घेतले तसेच ठाणे प्रभागातील काही गणेशोत्सव मंडळांना धावती भेट देत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडे नवी मुंबईतील दिघा विभागात असणार्‍या जनतेला सुख-समृद्धीची प्रार्थना केली.

यावेळी त्यांच्यासमवेत ऐरोली प्रभाग समिती अध्यक्ष संजू वाडे, शिवसेना नगरसेवक जगदीश गवते, नगरसेविका शुभांगी गवते, प्रवीण मिश्रा, समाजसेवक संजय वर्धमाने यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.