खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर

MP Sanjay Raut granted bail after three months मुंबई : कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते मात्र प्रत्येक वेळी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळे संजय राऊतांची दसरा-दिवाळीही तुरुंगातच गेली. आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

तीन महिन्यानंतर दिलासा
सुमारे तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्याने समर्थकांमध्ये आनंद पसरला आहे.

प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर
ठाकरे गटाचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना 31 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह त्यांचे सहकारी प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.