खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपाचा दिला राजीनामा

0

नवी दिल्ली-आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशमधील बहराईच मतदारसंघाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भाजपा समाजात फूट पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्यांनी राजीनामा देताना केला.

राम मंदिर हे मंदिर नसून देशातील ३ टक्के ब्राह्मणांच्या कमाईसाठीचा धंदा आहे, असा गंभीर आरोप खासदार फुले यांनी केला होता. तसेच भगवान राम हे शक्तीहीन आहेत. त्यांच्यात शक्ती असते तर अयोध्यामध्ये तेव्हाच राम मंदिर उभारले असते, असेही ते म्हणाले होते.

त्याचबरोबर भगवान हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते, असेही म्हटले होते. राम हे मनुवादी होते असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होते.