पुणे :- दोन दिवसापूर्वी रविना टंडनने हिने आंदोलन करण्याऱ्या शेतकऱ्याविषयी व्यक्तव्य केले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनेत्री रविना टंडन हिच्या वक्तव्याचा समाचार घेतला. गरीब शेतकरी किती कष्ट करतात याची जाणीव एके महिलेला नाही याचे आश्चर्य वाटते. शेतकरी आंदोलन करतात म्हणून त्यांना जेलमध्ये घालावे, हि किती योग्य आहे. सरकारचे लांगुलचालन तरी किती करावे, याचा अतिरेक रविना टंडन यांच्या व्यक्तव्यातून दिसून येतो, असेही सुप्रिया सुळे म्हणाले.
‘त्या’ वक्तव्यावर सारवासारव
अभिनेत्री रविना टंडन हिने आंदोलन करणा-या शेतक-यांविषयी “अतिशय क्लेशदायक आहे. तसेच आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचे नुकसान करणे दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये.” या आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर रविनावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती. दरम्यान, चोहोबाजुने टिका होत असताना रवीनाने आपल्या ‘त्या’ वक्तव्यावर सारवासारव करत आपल्या ट्वीटचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना नाही, तर शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असे आपण म्हंटल्याचे रवीनाने स्पष्ट केले आहे.