नंदुरबार : खासदार हिना गावीत यांच्या वाहनावर मराठा आंदोलकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार 6 ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी टायर जाळून तीव्रता दाखवली. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारला मोर्चा काढण्यात आला. धुळे येथे नंदुरबारच्या खासदार हिना गावीत यांच्या वाहनावर मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याने या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे.