खा. आढळराव पाटीलांनी घेतली ग्रामस्थांची भेट

0

शिक्रापूर । कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी व संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आढळराव पाटील यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला. तसेच कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेत पोलिस यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच या दंगलीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना त्यांच्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी महसूल व पोलीस यंत्रणांना योग्य पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या तसेच आपत्तीग्रस्त कुटुंबीयांचे आढळराव-पाटील यांनी सांत्वन केले.

कोरेगाव भीमा येथील नुकसानग्रस्त भागाची ग्रामस्थांसोबत पाहणी केली. खासदार आढळराव-पाटील यांनी या दंगलीत मयत झालेल्या राहुल फटांगडे याचे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कोरेगाव येथील संजय मुथा यांच्या आगीत भस्मसात झालेल्या दुकांनाची व संसाराची पाहणी करून कुटुंबीयांना धीर दिला यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार म्हणाले, या दुर्घटनेत नुकसान झाल्याने शासनाकडून सर्वोतोपरी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, तसेच लोकसभेत कोरेगाव भीमा प्रश्‍नावर आवाज उठवत या घटनेची सखोल चौकशीची व नुकसानग्रस्त कुटुंबीयांना योग्य भरपाई मिळण्यासाठी मी मागणी केली होती त्यावर लोकसभेत यावर चर्चा झालेली आहे खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले. शनिवारी घटनास्थळी आढळराव पाटील भेट घेतली होती. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके, शिवसेना नेते अनिल काशीद, जयश्री पलांडे तसेच कोरेगाव भीमा, सणसवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.