खा. आढळराव पाटील यांनी साधला नागरिकांशी संवाद

0

हवेली । हडपसर जवळील उरूळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती या परिसरातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार आपल्यादारी या गावभेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खासदारांनी अनेक प्रश्न सोडवले व काही प्रश्न सोडविण्याचे नागरिकांना आश्वासन दिले.

लोणी येथील कॉलेजला 10 कॉम्प्युटर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. माळवाडी येथील साकवपुल मंजूर केला. वीज बिलासंबंधीत अनेक तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या. लोणी येथील शाखा अभियंता जी. आर. मोरे यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली. लवकरच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या गावभेट दौर्‍याला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांनी यावेळी अनेक प्रश्न मांडले. पालखी स्थळ व गतीमंद शाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्रद्धा कदम यांनी सांगितले. तसेच पृथ्वीराज कपूर शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी 10 लाखाचा निधी दिल्याचे स्वप्नील कुंजीर यांनी सांगितल. या कार्यक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.