खा. ए.टी.पाटलांनी लोकसभा लढवूनच दाखवावी

0

जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांचे आव्हान

जळगाव – खासदार ए. टी. पाटील यांना वाटत असेल त्यांनी खूप चांगले कार्य केले आहे., लोक त्यांना निवडून देतील तर त्यांनी लोकसभेची निवडणुक लढवूनच दाखवावी असे खुले आव्हान जलंसपादा मंत्री गिरीश महाजन यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिले.
भाजपाच्या बैठकीसाठी जलंसपदा मंत्री गिरिश महाजन आज जळगावात आले होते. यावेळी जीएम फाऊंडेशन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ना. महाजन यांनी पुढे सांगीतले की, खा. ए. टी. पाटीलांनी फार मोठे काम केले आहे. त्यांना वाटत असेल लोक त्यांना निवडून देतील तर त्यांनी निवडणूक लढवावी व अनामत रक्कम वाचवून दाखवावी असेही महाजन म्हणाले. खा.ए.टी. पाटील यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. त्यांनी काम केले असल्यास लोकसभेची निवडणूक लढावावी असे आव्हानच मी त्यांना देतो. असेच आव्हान मी धुळ्यात अनिल गोटे यांना देखील दिले होते.अमळनेरचे आ. शिरीष चौधरी यांच्याशी बोलणे झाले आहे. ते उमेदवारी अर्ज मागे घेतील असा दावा त्यांनी केला आहे. नंदुरबार येथील माजी खासदार माणिकराव गावित यांच्या मुलाच्या भाजपा पक्ष प्रवेशाबद्दल विचारले असता, आता मला काही माहीत नाही, दोन दिवस वाट बघा असा सूचक इशारा देखील महाजन यांनी यावेळी दिला. शिवसेनेला स्थानिकपातळीवर सत्तेत सामावून घेण्यासाठीच्या मागणीबद्दल चर्चा होइल. मनपा आणि जिल्हा परिषदेत आम्ही स्पष्ट बहुमतात आहोत त्यामुळे तेथे शिवसेनेला सत्तेत सहभागी करणे अवघड असल्याचेही त्यांनी सांगीतले. राज्यात काही ठिकाणी भाजपा तर काही ठिकाण शिवसेना स्थानिक पातळीवर स्पष्ट बहुमतात आहे. आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो आहोत असेही महाजन यांनी सांगीतले.