नंदुरबार । नगरपरिषदेच्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारकार्यासाठी घरोघरी भेटी देणे आदी पारंपारिक पध्दती वावरण्या बारोबरच भारतीय जनता पार्टीने आधुनिकि सोयी सुविधांनी आपला प्रचारताफा सुसज्ज केला आहे. यात आकर्षक प्रचार रथ, एलईडी व्हॅन, आकशात उडणारा मोठा बलून, सायकलस्वारांचे पथक, वासूदेवांचे पथक अशा विविध गोष्टींचा समावेश असून रविवारी या प्रचारसाहित्यांचा शुभारंभ करण्यात आला.
पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी
रविवारी सकाळी शहरातील अंधारे चौक येथे या प्रचारताफ्याचा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षा खा. डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आ. शिरीष चौधरी, नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रा. रविंद्र चौधरी यांच्याहस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष मोहन खानवाणी, जेष्ठ कार्येकर्ते पुखराजकाका जैन, हिरा उद्योगसमुहाच्या संचालिका रेखा चौधरी, भाजपाच्या ओबीसी मोर्चांचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, महिला आघाडीच्या अॅड. उमा चौधरी, सविता जयस्वाल, शहराध्यक्ष सपना अग्रवाल, भाजपाचे अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष कुरेशी, उस्मानभाई नाथाणी, भाजपाचे नगरसेवक पदाचे उमेदवार ईश्वर जयराम चौधरी, केतन रघुवंशी, प्रविण मक्कन चौधरी, मुकेश अहिरे, राकेश पाटील, दिनेश बागुल, वसईकर व अन्य उपस्थित होते. शुभारंभ करण्यात आलेल्या प्राचारताफ्यात दोन प्रचाररथ, सात एलईडी व्हॅन, 10 सायकली यांचा समावेश आहे. या शिवाय 10 वासूदेवांचे पथकही कार्यरत करण्यात आले. वासूदेव रोज सकाळी घरोघर फिरून भाजपा उमेदवारांचा प्रचार करू लागले आहेत. सायकलींवर पक्षाचे ध्वज आणि उमेदवारांचे नाव माहिती असलेले फलक लावून ते निराळे पथक कार्यरत झाले आहे. शहरांच्या वसाहतींमध्ये आणि चौका चौकांत थांबून एलईडी व्हॅनद्वारे मोदी सरकारने केलेल्या कामांसह नंदुरबार शहर विकासाचे व्हिजन सचित्र मांडले जाणार आहे. शिवाय चित्ररथ फिरणार असून मोठाले बलून विविध भागात फिरवले जात असून नंदुरबार शहर भाजपमय बनले आहे.