नंदुरबार । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजना व शिवार भेट योजनेचा शुभारंभ नांदरखेडा गावात होणार असल्याची माहिती माहिती खा. डॉ हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या की, रावसाहेब दानवे यांचे सकाळी 9 वाजता शहादा तालुक्यातील नांदरखेडा या गावात आगमन होईल. त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते पंडित उपाध्याय कार्यविस्तार व शिवार भेट योजनेचा शुभारंभ करण्यात येईल. या वेळी ते शेतकर्यांशी संवाद साधतील. हा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 1 वाजता नंदुरबार येथे शिवाजी नाटयमंदीरात दानवे यांच्या उपस्थितित शेतकर्यांचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे, अशी माहिती खा. हिना गावीत यांनी दिली.