जळगाव – रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचे जनतेच्यादृष्टीने महत्वाचे असलेल्या मुद्यांकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी आज पत्रकार परीषदेत केला.
काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परीषदेत बोलतांना जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी सांगितले की, १० वर्षानंतर रावेरची जागा काँग्रेसला सुटली असल्याचे सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं (कवाडे गट) महाआघाडी रावेर लोकसभा मतदारसंघात संपुर्ण ताकदीनिशी लढणार आहे. निवडणुक काळात भाजपाच्या खा. रक्षा खडसे यांनी पाच वर्षापुर्वी दिलेली आश्वासने किती पुर्ण झाली याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार आहे. खा. रक्षा खडसे यांचे महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी पत्रकार परीषदेस प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सचिव माजी आ. शिरीष चौधरी, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, शहराध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, अॅड. अविनाश भालेराव, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, अजबराव पाटील, श्रीधर चौधरी, देवेंद्र मराठे आदी उपस्थित होते.