शिंदखेडा । शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खा.संजय राऊत व जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात धुळे जिल्हा दौर्यांवर असून शिंदखेडयात रविवार 12 नोव्हेबर रोजी शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. दु.3 वाजता शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात मेळावा होत आहे. यावेळी वरपाडा चौफूलीवर शिवसेनेच्या धुळे जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खा.संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे.
पदाधिकार्यांची होणार बैठक
मेळाव्यानंतर सायंकाळी 5 वाजता शिरपूर व 6 वाजता शिंदखेडा विधानसभा मतदार संघाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा संघटक, तालुकां संघटक, शहरप्रमुख, शहर संघटक, उपशहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख, शिवसैनिकांसह संलग्न संघटना युवासेना, महिला आघाडी, एस. टी. कामगार सेना, वाहतूक सेना, भारतीय कामगार सेना व ग्राहक संरक्षण कक्षाचे शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन कारभारी आहेर(सहसंपर्क प्रमुख) हेमंत साळुंके (जिल्हाप्रमुख धुळे ग्रामीण) यांनी केले आहे