खा.संजय राऊतांनी दिली देहली धरणास भेट

0

अक्कलकुवा। आंबाबारी तालुका अक्कलकुवा येथील सन-1974 पासून संथगतीने सुरु असलेल्या देहली नदीवरील धरणाचे पाहणी करून प्रकल्पग्रस्त नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आंबाबारी येथे आले होते. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी गेल्या 40 वर्षापासून सुरु असल्याबाबत खंत व्यक्त करून लवकरच सदर प्रकल्प पूर्ण व्हावा अशी मागणी केली.

प्रकल्पग्रस्तांच्या समस्या घेतल्या जाणून
आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत, तसेच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यात शेतकरी मेळाव्यासाठी आले होत. दरम्यान त्यांनी अक्कलकुवा तालुक्यातील गेल्या 40 वर्षापासून रखडलेल्या देहली प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख दीपक गवते, जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, डॉ. विक्रांत मोरे , तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी , मधुकर मिस्तरी, महिला आघाडीच्या रीना पाडवी, वंदना पाटील, जि. प.सदस्या सुनीता वसावे, शहर प्रमुख नंदलाल चौधरी, उपतालुका प्रमुख किशोर ठाकूर, तुकाराम वळवी, कार्यकारी अभियंता डि. बी.जोशी, लक्ष्मण वाडीले, नटवर पाडवी, सरपंच जोवराबाई पाडवी, विनोद वळवी, चंदू तडवी, युवा सेनेचे रोहित चौधरी, जिग्नेश सोनार, तापसिंग वसावे, संतोष पवार, सिंधुताई पाडवी, नासिर बलोच, संतोष पाटील, अश्विन सोनार, अजय सोनार, दीपक मराठे, शीतल पाडवी, राजेश तडवी, मोहन महाराज , शाकीब पठाण, आदी उपस्थित होते. यावेळी देहली मध्यम प्रकल्पात असलेल्या बाधितांच्या विविध समस्यांबाबत खासदार संजय राऊत यांनी पाहणी केली.