जळगाव । नुतन मराठा महाविद्यालयात राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. या चर्चेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, मराठा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, संचालक डी.जी.पाटील आदी उपस्थित होते.