वरखेडी – येथील श्रीमती पी.डी.बडोला विद्यालात खासदार सुप्रिया सुळे यांची सदिच्छा भेट पाचोरा येथील संवाद व महीला मेळावा कार्यक्रम आटोपुन शेदुर्णीच्या कार्यक्रमासाठी जात असताना वरखेडी येथील श्रीमती पि.डी. बडोला माध्यमीक विद्यालयातील विद्यार्थीनींसह ग्रामस्थ व शिक्षक यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांचे स्वागत करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शाळेच्या मुली सोबत व उपस्थिता बरोबर हिंतगुज केले. शेतकरी संघ पाचोरा संचालक डिंगबर पाटील, माजी पं.स.सदस्य रशिद हाजी उखर्डू, माजी सरपंच डॉ.अलताफ शेख, कॉग्रेसचे डॉ.धनराज पाटील, सिमा ठोके, शहनाजबी अलताफ काकर, श्रीमती चौधरी, अफसर रशिद, शाळेचे मुख्याध्यापक अशोक चौधरी, पर्यवेक्षक अतुल ठोके, निलेश कुमावत, आर.एस.ब्राम्हणे, गणेश अगळे, ए.जी.चौधरी, अशोक देशमुख आदी उपस्थित होते.