खिरवडच्या मनोरुग्ण महिलेवर अत्याचार

0
रावेर पोलिसात गुन्हा दाखल 
रावेर- तालुक्यातील खिरवड येथील 32 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मंगळवार, 28 रोजी  तालुक्यातील खिरवड गावात दुपारी दोन वाजेच्या सुमारास  पीडीत मनोरुग्ण महिला घरात एकटी असल्याची संधी साधून संशयीत आरोपी युवराज तुळशीराम कोळी याने अत्याचार केल्याचा आरोप आहे.  याबाबत आरोपी युवराज कोळीविरुध्द भादंवि 376 प्रमाण रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार प्रवीण निकाळजे करीत आहेत.