खिरवड येथील अवैध दारू दुकाने बंद करा

0

रावेर । तालुक्यातील खिरवड गावात अवैध दारू बंद करण्यासाठी संभाजी ब्रिगेड तर्फे तहसीलदार व पोलिस स्टेशनला निवेदन देऊन विक्रेत्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आले आहे.खिरवड गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरु आहेत. गावातील तरुण नागरिक हे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे अनेकांची सुखी संसार उध्वस्त होत असून घराघरांमध्ये भांडणे सुरू आहे. तरी अशी अवैध दारू विक्री करणार्‍यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी संभाजी बिग्रेड तर्फे करण्यात आली आहे यासंदर्भाचे निवेदन नायब तहसीलदार सी.एच.पाटील व पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांना देण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी संभाजी बिग्रेडचे तालुकाध्यक्ष विलास ताठे, विनोद चौधरी, सौरभ चौधरी, स्वप्नील पाटील, जितेंद्र चौधरी, लीलाधर चौधरी, योगेश पाटील, धीरज चौधरी, सचिन चौधरी, कृष्णा कोळी, जगदीश चौधरी, सोनवणे, आकाश कोळी, विलास कोळी, बबलू सावंत, प्रशांत पाटील आदी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.