भुसावळ : सावदा येथून जवळच असलेल्या खिरोदा प्र. यावल ता. रावेर येथील बस स्टॅण्ड परिसरात राहत असलेल्या तुषार यादव चौधरी यांचे राहते घरास 24 रोजी दुपारी 2.45 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली यात संपुर्ण घर जळून खाक झाले. यावेळी घरात एकटी असलेली तुषार चौधरी यांची भाची योगिता रमेश चौधरी (वय 16) ही दुदैर्वीरित्या जळून तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तुषार चौधरी यांच्या घरातून धुराचे लोट येत असल्याचे दिसल्यावर गावातील नागरिकांनी तिकडे धाव घेतली. यावेळी तुषार चौधरी व त्यांचा परिवार बाहेर गेला होता. नागरिकांनी अग्नीशमन दलाचे साह्याने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत संपुर्ण घर जळून खाक झाले होते
आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज
घराचे पत्रे उचकवून नागरिकांनी घरात प्रवेश केला असता घरात योगिता चौधरी ही संपुर्ण जळून तीचा कोळसा झाल्याचे निदर्शनास आले. आग लागली त्यावेळी योगिता ही घरी एकटी होती व घरचे सर्व बाहेर गेले होते आग अचनाक लागल्यानंतर ती भेदरली असावी व धुरामुळे गुदमरुन ती बेशुध्द पडली व त्यातच तीचा जळून मृत्यू झाला असावा असा कयास व्यक्त होत आहे. या आगीत घरातील संपुर्ण साहित्य जळून खाक झाल्याने यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग अग्नीशमन दल व गावातील नागरिकांनी आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत मोठी हानी झालेली होती. घटनेचा पंचनामा सावदा पोलीस तसेच महसुल विभाग यांनी केला. योगिता चौधरी हि आपल्या आई सोबत आपले मामा तुषार चौधरी यांचे कडेच राहत होती तेथेच शिकत होती ती आता इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. आग लागली त्यावेळी योगिता हि घरात एकटीच होती घरचे बाहेर गेले असल्याचे समजते.