खिरोद्यातील विवाहिता मुलासह बेपत्ता

0

खिरोदा- गावातील 30 वर्षीय विवाहिता आपल्या 13 वर्षीय मुलासह बेपत्ता झाल्याची घटना 16 रोजी घडली. या प्रकरणी सावदा पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. गावातील विवाहिता नसीन बी.सैय्यद मेहबूब (30) ही मुलगा दानिश सैय्यद मेहबूब (13, दोन्ही रा.खिरोदा) हे 16 रोजी सकाळी 11 वाजता बेपत्ता झाले. या प्रकरणी विवाहितेचे वडील शब्बीर सैय्यद शब्बीर हसन (78, देवास, मध्यप्रदेश) यांनी खबर दिल्यावरून सावदा पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास पाटील करीत आहेत.