खिर्डी : गावातील तरुणाचा तांदलवाडी गावानजीक दुचाकीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अजय अनिल कोचूरे (रा.खिर्डी खूर्द) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत अजय दुचाकीवरून तांदलवाडी ते गाते रस्त्यावरून जात असताना राजाराम गणू महाजन यांचे शेताजवळ दुचाकीचा ताबा सुटल्याने ती खड्ड्यात जावून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने अजयचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी निंभोरा पोलिसात नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कुमावत करीत आहे.