खिर्डीच्या युवकाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू

0

निंभोरा- जवळच असलेल्या खिर्डी येथील युवकाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या युवकाने आत्महत्या केली की अन्य कुठल्या कारणावरतून त्याचा मृत्यू झाला? याबाबत निंभोरा पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. जीवन कमलाकर कोचुरे (27, रा.खिर्डी बु.॥) असे मृत युवकाचे नाव आहे. गेल्या 1 तारखेपासून तो बेपत्ता होता. शुक्रवारी दुपारी एकनाथ कमल महाजन यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी दिवाकर विठ्ठल कोचुरे (56, खिर्डी बु.॥) यांनी खबर दिली.