खिर्डीतील ‘जनशक्ती’ पत्रकाराने जोपासली भूतदया ; खिर्डीत वाचवले पक्षाचे प्राण

खिर्डी,  ता.रावेर : समाजाचा आरसा बनून काम करणे इतकीच जवाबदारी न निभावता खिर्डीतील दैनिक जनशक्तीचे पत्रकार सादीक पिंजारी यांनी जखमी झालेल्या पक्षावर वेळीच उपचार केल्याने पक्षाचे प्राण वाचले.

वेळीच झाले कबुतरावर प्रथमोपचार
झाले असे की, खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थान परीसरात शुक्रवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास पतंगाच्या दोर्‍यामध्ये अडकून खाली पडलेल्या कबुतर (होलगा) हा पक्षी जखमी झाला. यावेळी पक्षी मित्र असलेल्या पत्रकार सादिक पिंजारी यांनी पक्षाच्या एका पंखावर मोठ्या जखमा आढळून आल्यामुळे त्यांनी तत्काळ गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेवून कबुतरावर प्रथमोपचार करून घेतले. पशु आरोग्य सेवक सुपडू तायडे यांनी याकामी सहकार्य केले. कबुतरावर दोन ते तीन दिवस मलमपट्टी करावी लागणार असल्याने त्यास श्रीकृष्ण मंदिर संस्थानमध्ये ठेवण्यात आले आहे. यावेळी सादिक पिंजारी, प्रदीप महाराज पंजाबी, प्रवीण शेलोडे, भीमराव कोचुरे आदी उपस्थित होते.