खिर्डी : खिर्डी खुर्द येथील गट नंबर तीनमधील बाजार पेठ परीसरात 10 ते 15 वर्षापासून दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत शौचालयाचे बांधकाम करण्यात आले परंतु या ठिकाणी अद्यापपर्यंत दिवाबत्तीची, पाण्याची रस्त्याची सोय करण्यात आली नसल्याने रात्री-बेरात्री नैसर्गिक विधीसाठी ग्रामस्थांना अंधारातून पायवाट काढत रस्ता पार करावा लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे जवळच गावातील सांडपाणी वाहून नेणारी गटार असल्याने त्या ठिकाणाहून विंचू-काट्यााह भले मोठे साप या ठिकाणी अन्नाच्या शोधार्थ फिरताना दिसतात त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी उकीरडा निर्माण झाला असून ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी, अशी अपेक्षा असून सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात, अशी मागणीही ग्रामस्थ करीत आहेत.