खिर्डी : गावातील स्वस्त धान्य दुकानास फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्यासह रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी अचानक भेट देऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत तांदुळाचे वाटपाबाबत चौकशी केली तसेच कुणीही लाभार्थी धान्यापासून वंचित ठेऊ नये अश्या सूचना केल्या. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना मोफत तांदूळ वाटपाबाबत माहिती जाणून घेत सोशल डिस्टन्सची पाहणी करण्यात आली. दुकानदाराने केलेल्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, मंडळाधिकारी मीना तडवी, खिर्डी तलाठी एफ.एस.खान, बलवाडी तलाठी निलेश पाटील, तांदलवाडी तलाठी रेखा जोरवार, कांडवेल तलाठी अतुल बडगुजर, शिंगाडी तलाठी एच. पी.जोशी, ग्रामविकास अधिकारी विजय महाजन, रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष गुणवंत पाटील, पोलिस पाटील प्रदीप पाटील, पत्रकार प्रवीण धुंदले, पत्रकार कांतीलाल गाढे, पत्रकार सादीक पिंजारी, शेख इद्रिस भाई व सर्व पत्रकार मंडळी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.