खिर्डी : जगभर सुरू असलेल्या कोरोना रोगाच्या महामारीत लग्न, वाढदिवस, असे कार्यक्रम साध्या घरगुती पद्धतीने साजरे करून सामाजिक कामात मदत व्हावी या हेतून खिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ता सतीश फेगडे यांनी वाढदिवसानिमित्त खिर्डी खुर्द येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिकारक शक्ति वाढवणार्या
आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी राजेंद्र महाजन, यश महाजन, राहुल महाजन, सौरभ चौधरी, मयुर इंगळे, गौरव कोळंबे, सागर महाजन, गणेश बोरणारे, नईम बेग, सुपे सर उपस्थित होते.