खिर्डीत बाहेर गावावरून येणार्‍यांसाठी विलगीकरण कक्ष

0

खिर्डी : फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व रावेर गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे यांच्या आदेशावरून खिर्डी खुर्द ग्रामपंचायतीने एस.पी.राणे माध्यमिक विद्यामंदीरात बाहेर गावावरून आलेल्या ग्रामस्थांसाठी विलगीकरण कक्ष तयार केला आहे. बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तीने व त्यांच्या नातेवाईकांनी विलगीकरण कक्षात राहण्यासाठी विरोध केल्यास अथव नकार दिल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून कोणीही बाहेरील व्यक्ती नातेवाईक आल्यानंतर त्याला विलगीकरण कक्षात दाखल करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी ग्रामसेवक गोकुळ सोनवणे, खिर्डी खुर्द पोलिस पाटील प्रदीप पाटील, शाळेचे उपाध्यक्ष विलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य नीळकंठ बढे, ग्रामपंचायत सदस्य अलताब बेग व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होता.