खिर्डीत मास्क न लावणार्‍या सात जणांवर दंडात्मक कारवाई

0

खिर्डी : कोरोना संसर्गापासून आपल्या परीसराचा बचाव करण्यासाठी प्रशासनाने गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केली असून प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी मास्क न लावणार्‍यांविरुद्ध 500 दंड आकारण्याचे सक्त आदेश दिले आहे. त्यानुसार शुक्रवारी खिर्डीत सात जणांवर कारवाई करण्यात आली. सध्या लॉक डाऊन सुरू आहे तरी काही लोक विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यांवर भटकताना दिसत असल्याने त्यांच्याविरुद्ध प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी मास्क न लावणार्‍या चार लोकांवर पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली आहे तर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी एफ.एस.खान, कोतवाल अनंत कोळी, सर्कल अधिकारी मीना तडवी यांनी तीन जणांवर दंडात्मक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.