खिर्डी : निंभोरा पोलिसांनी खिर्डी व निंभोरा येथे बुधवारी सायंकाळी मास्क न लावता विनाकारण फिरणार्यांविरुद्ध तसेच दुचाकीवर डबल सीट प्रवास करणार्यांसह सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघण करणार्या सुमारे 17 नागरीकांवर कारवाई केल्याने खळबळ उडाली. खिर्डी व निंभोरा येथील एकूण 17 जणांविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राकेश वराडे, कॉन्स्टेबल स्वप्निल पाटील, शेख सादीक ही दंडात्मक कारवाई केली.